Saturday 12 July 2014

गुरुपोर्णिमा विशेष….!!

आज गुरुपोर्णिमा म्हणजे आषाढपोर्णिमा… आपल्या आयुष्यातील सर्व गुरूंना करायचा आणि त्यांचे आभार मानायचा क्षण… चुकीच्या क्षणी गुरु शिष्याला मार्गदर्शन करतात आणि कठीण समयी योग्य रस्ता दाखवतात… अशाच एका गुरु शिष्याच्या नात्याची गोष्ट… छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी…

छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहर च्या वेढ्यात अडकले होते… वेढा इतका कडक होता कि माणूस काय एक पाखरुही बाहेर पडू नव्हतं… काय करावे हे उमजत राजांना नव्हते… सगळे प्रयत्न वाया गेलेले… नेताजी पालकारांचा हल्ला सिद्धीच्या सैन्याने परतवला होता… अशा बिकट समयी आले राजांच्या मदतीला आले ते आनंद रामदासी… रामदासी म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य… त्यातीलच एक म्हणजे आनंद रामदासी…

आषाढ पौर्णिमेच्या आदल्या रात्री गडाच्या किल्लेदाराला पहारा देताना तटावरून एक माणूस वर येताना दिसला… माणूस वर आला तेव्हा सर्वांनी त्याला पकडले आणि विचारले " कोणाला भेटायचं??" तो माणूस म्हणाला " राजांना सांगा… आनंद रामदासी आले आहेत…" मध्यरात्री घाबरत सैनिकाने राजांना उठवलं आणि सांगितलं कि आनंद रामदासी आले आहेत… राजे तडक उठून बाहेर आले आणि रामदासिंना भेटले… रामदासी म्हणाले " राजे… पन्हाळ गडाच्या वायव्येला सिद्धीचा वेढा खूप कमी आहे… रात्रीच्या वेळेस तुम्ही तिथून निसटून विशाळगडावर जाऊ शकता… विशाळगडावर सूर्यराव सुर्वेंचा वेध आहे आणि तुम्ही इथून तिथे जाणार नाही असा सिद्धीला वाटते आहे… तेव्हा राजे… कसही करून इथून निसटा आणि एकदा इथून सुटलात कि तुम्ही विशाळगडावर तुम्ही सहज पोहचाल… " आणि ठरल्याप्रमाणे राजे दुसर्या दिवशी राजे बाजीप्रभू देशपांडे आणि निघाले… तीच ती आषाढ पोर्णिमा… आणि पुढे राजे कसे सुखरूप पोहोचले हे आपल्याला चांगलंच माहित आहे… बाजीप्रभूंचा पराक्रम… शिवा काशीदचा पराक्रम… आणि राजांची झालेली सुखरूप सुटका…

अशी असते गुरु शिष्य परंपरा… आपला शिष्य मोठ्या संकटात सापडला आहे आणि त्याला मार्ग मिळत नाही तेव्हा रामदासी मार्फत शिष्याला योग्य मार्ग दाखवला… अशा सर्व गुरूंना मनापासून वंदन…

No comments:

Post a Comment