जादू, चमत्कार या सर्व शब्दांवर माझा विश्वास नाही पण आनंदवनातील गोविंदा काकांना भेटलो, त्यांची कारागिरी पाहिली की हे शब्दही कमी पडतात. चैतन्यच्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाच्या निमिताने मी आनंदवनात गेलो होतो. अर्थात दोन दिवसाच्या मुक्कामात सर्व काही पाहता येत नाही पण मोजके प्रकल्प पाहिले आणि आमची ओळख झाली ती गोविंदा काकांशी.
आनंदवनात काष्ठ शिल्प विभाग आहे ज्यात लाकूड, बांबूपासून बनवलेल्या वस्तू आहेत. आणि गोविन्दा तिथे काम करतात आणि तो विभागही पाहतात.
काष्ठ शिल्प विभागात गेलात की तुम्हाला जादू दिसायला सुरु होते. वेगवेगळ्या लाकडांच्या खोडापासून तयार केलेल्या वस्तू. विविध आकाराच्या खुर्च्या असतील किंवा इतर वस्तू जर आपण पाहिल्या तर त्याची फिनिशिंग, त्याची रचना हे सर्व पाहता एखाद्या कसलेल्या कारागिराने हे बनवलं याची खात्री पटते. पण तुम्ही म्हणाल यात काय मोठं? अनेक कारागीर आहेत की जे अशा अनेक वस्तू बनवतात. हो, त्यात काही मोठं नाही. पण विशेष तेव्हा होतं जेव्हा आपल्याला समजतं की गोविंदा काका हे महारोगाने त्रस्त होते आणि त्यातून आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत. हाताची बोटं नसताना, अनेक आव्हानांना सामोरं जाऊन हे घडवणं हे विशेष आहे. नुसता शारीरिक व्याधी नव्हे तर मानसिक संतुलनही ढासळू न देता, समाजातील विटाळ नजरांचा सामना करून ही शिल्पं साकारणं हे विशेष आहे.
ही सर्व शिल्प पाहताना मला अजून एक गोष्ट दिसली, जी पाहून मी माझ्या या Blogला "आनंदवनातील जादूगार" हे नाव दिलं आहे. माझ्या या पोस्ट मध्ये तुम्हाला एक बाटली दिसत असेल. त्या बाटलीच्या आत लाकडापासून बनवलेली एक वस्तू आहे. त्या वस्तूचा आकार बघता बाटली न तुटता ती आतमध्ये गेली कशी हा प्रश्न उभा राहतोच. आश्चर्य आहे. नंतर काकांशी बोलताना त्यांनी सांगितलं की ही कलाकारी त्यांनी बाटलीच्या आतच केली.

अशा अनेक वस्तू असलेल्या अनेक बाटल्या आहेत ज्या गोविंदा काका मला दाखवत होते. आणि त्यांनी दाखवलेली प्रत्येक गोष्ट मला नव्याने अचंबित करत होती. या विभागात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या आहेत.
या माझ्या पोस्टच्या शेवटी इतकाच म्हणेन की, अनेकदा आपण आपल्या छोट्या छोट्या दुःखात इतके अडकतो की नवीन संधी, नव्या वाटा आपल्याला दिसत नाहीत. पण गोविंदा काकांसारखे अवलिया पाहिले की समजतं आपलं दुःख काहीच नाही. कधी आनंदवनात भेट दिली तर "काष्ठ शिल्प" विभागाला नक्की भेट द्या आणि गोविंदा काकांनाही भेटा. तुम्हाला भेटून त्यांनाही आनंद होईल आणि आपुलकीने कोणीतरी त्यांच्या वस्तू पाहत आहेत ही गोष्ट त्यांनाही समाधान देऊन जाईल. धन्यवाद.
आपला,
प्रथमेश तेंडुलकर

Note - काष्ठ शिल्प विभागात गोविंदा काकांनी बनवलेल्या वस्तूंचे फोटो इथे दिले आहेत. नक्की बघा.

प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असते पण त्या पलीकडील जग बघायची वृत्ती काहीजणांकडे असते आणि त्यातून ही मोजके च बाहेर पडून गोविंद काकांसारखे बनतात. गोविंद काका नक्कीच सगळ्यांना प्रेरणा देत आहेत. मी ही ती बाटली झूम करून पाहिली आणि अवाक झालो.. त्यांच्या कलेला सलाम...
ReplyDeleteब्लॉग छोटा असला तरी सुटसुटीत आणि मुद्देसूद आहे.
अद्भुत, अद्वितीय, अप्रतिम, कौतुकाचे ह्या पलीकडे शब्द आहेत ते सर्व च्या सर्व एकत्रित करून त्यांचा पुष्पगुच्छ करून जरी ह्या आदरणीय कलावंत श्री गोविंद रावांना दिला तरी देखील अपूर्णता बाकी नक्कीच राहील च राहील, थोर 💐थोर 🌹थोर 🌹
ReplyDelete