Tuesday 10 June 2014

...... तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणे बंद करा…

महाराष्ट्र… आपला महाराष्ट्र… महाराष्ट्र म्हणजे  संतांची भूमी… महाराष्ट्र म्हणजे अनेक वीरांची आणि समाजसुधारकांची भूमी… महाराष्ट्राला आहे ती हजारो वर्षांची परंपरा ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे… पण… गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून महाराष्ट्राची परंपरा हीच का?? असा प्रश्न मनात येतो…

कुठेतरी काहीतरी होता आणि त्याचा परिणाम म्हणून अख्खा समाज त्यात भरडला जातो… कोणीतरी विकृत मानसिकतेची लोकं आपल्या आदर्शांचा, आपल्या महापुरुषांचा अपमान करतात, तेही फेसबुक आणि इतर social media मधून… आणि आपण काय करतो?? आपल्याच माणसांना त्रास देतो… कोणीतरी ४-५ लोकांच टवाळक येतं, हातात भगवा झेंडा घेऊन आणि मग हे बंद आणि ते बंद च्या नावाखाली बसेस पेटवून देतात, दुकानं फोडतात, गाड्या जळतात… पण त्यांना हे कळत कस नाही कि ह्या सर्व सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पैशातून उभ्या राहिल्या आहेत… आपण जे बंद करतो आहोत त्यामुळे त्या विकृत माणसाला काहीच फरक पडत नाही आहे… उलट असा करून आपण त्याला जे करायचं ते सध्य करून देतोय… आणि तसही हे सर्व करून तो विकृत माणूस सापडणार आहे का?? उलट अशाने पोलीसांच सगळ लक्ष ह्यांना सांभाळायला जात आणि ते मुख्य आरोपी मात्र मोकाटच सुटलेले असतात…

बरं जे लोक हे भगवे झेंडे घेऊन आणि छत्रपतींच नाव घेऊन हे उद्योग करतायत त्यांना आधी भगव्या झेंड्याचा अर्थ तरी नीट समजला आहे का?? भगवा झेंडा हे शौर्य आणि वैराग्य ह्याच प्रतिक आहे… त्यामागे शिवाजीमहाराजांची कित्येक वर्षांची मेहनत आणि प्रेरणा आहे… पण आज मात्र हा भगवा झेंडा दहशत निर्माण करण्यासाठी वापरला जातोय आणि महत्वाच म्हणजे हि दहशत मात्र आपल्याच मराठी माणसावर होतेय… शिवरायांचा वचक हा जे लोक हिंदवी स्वराज्याच्या रस्त्यात आडवे येतील त्यांच्यावर असायचा पण आज मात्र सगळच उलटं आहे… जे लोक चुकीचे आहेत ते मात्र मस्त मजा  बघतायत आणि आपण आपापसातच भांडतोय…

कुठलीही गोष्ट करायच्या आधी ह्याच गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे कि हीच का आपली महाराष्ट्राची परंपरा?? हीच का आपल्या संतांची शिकवण?? महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात हे घडणं म्हणजे आपल्यावरच एक कलंक आहे… आणि जर हेच करायचं असेल आणि असाच वागायचं असेल तर महाराष्ट्राला पुरोगामी म्हणणं बंद करा…

5 comments:

  1. without ethics and education , change is impossible ........

    ReplyDelete
    Replies
    1. correct.. something is changing is not a immediate process.. it will take time, its a long time process...

      Delete
  2. जे लोक विटंबना करतात त्यांनाच दंगल घडवून आणायची असते....सामान्य लोक स्वतःचेच नुकसान करून त्यांची इच्छा पुर्ण करतात....थोर महापुरूष मानअपमानाच्या पलिकडे आहेत..त्यांचे कर्तुत्व त्यांचे विचार यांना जोवर धक्का पोहचत नाही तोवर त्यांचे अपमान कोणीही करू शकत नाही..

    ReplyDelete
  3. आज जरा कुठे खुट्ट झालं तरी बंद पाळला जातो....बंद पाळणारा प्रत्येकजण सहभागी असल्याचे समजले जाते..मुळात हातावर पोट असणारे हमाल, मजूर किंवा नाशवंत माल असणारे शेतकरी विक्रेते स्वतःचे नुकसान का बरे करतील....एखादे दुःख झाले किंवा निषेध करायचा तर काम बंद का ??? दैनंदीन व्यवहार सुरू ठेऊन निषेध नोंदवता येतोच की..काळी फीत लावा..किंवा दुकानासमोर निषेधाचे फलक लिहा ..गरीब लोक, आजारी लोक, गरोदर माता ,वृध्दांचा विचार का केला जात नाही???

    ReplyDelete
    Replies
    1. khara ahe.. Japan madhe strike karnyachi paddhat vegli ahe.. eka shoes company ne Japan madhe strike kartana production band kela nahi tar fakt eka paayache shoes manufactured kele.. mhanunch Japan aaj pudhe ahe..

      Delete